10,000 पत्रकारांची आरोग्य तपासणी 

0
933

मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिवस

‘पत्रकार आऱोग्य तपासणी दिवस’ म्हणून साजरा करणार

मुंबई दिनांक 2 (प्रतिनिधी ) पत्रकारांची पहिली संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा 79 वा वर्धापन दिन उद्या ‘राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी दिन‘ म्हणून साजरा करण्यात येत असून राज्यातील सर्वच जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थानिक पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार आहे.राज्यभरात उद्या किमान दहा हजार पत्रकारांची आणि त्यांच्या कुुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.

देशातील मराठी पत्रकारांची पहिली संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी झाली आहे.काकासाहेब लिमये हे परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते.या घटनेला उद्या 78 वर्षे पूर्ण होत असून परिषद 79 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.परिषदेचा हा इतिहास दैदीप्यमान असाच राहिलेला आहे.या दिवसाचे स्मरण राहावे यासाठी परिषदेने गेली पाच वर्षे परिषदेचा स्थापना दिवस हा पत्रकार आरोग्य तपासणी दिवस म्हणून साजरा करायला सुरूवात केली आहे.गेल्या वर्षी 24 जिल्हयातील पत्रकारांची आरोग्य तपासणी केली गेली.यंदा किमान 30 जिल्हयात तरी हा उपक्रम पार पाडला जाणार आहे.स्थानिक डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांच्या सहकार्याने ही शिबिरं घेतली जात आहेत.पत्रकारांचे जीवन दगदगीचे आणि तणावपूर्ण असते.अनेकदा आपल्या प्रकृत्तीकडेही पत्रकारांचे दुर्लक्ष होते.त्यामुळेच गेल्या तीन वर्षात 22 तरूण पत्रकारांचे ह्रदयक्रिया बंद पडून निधन झाले आहे.अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये यासाठी परिषदेने पुढाकार घेतला असून पत्रकारांची आरोग्य तपासणी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख ,विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here