उत्कृष्ट तालुका पत्रकार संघ पुरस्कार
वितऱण 25 जूनला नागपूरमध्ये
 
महाराष्ट्रातील पत्रकारांची संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने यावर्षीपासून वसंतराव काणे उत्कृष्ट तालुका पत्रकार संघाना पुरस्कार देण्यात येत आहेत.यंदा हे पुरस्कार यापुर्वीच जाहीर झालेले आहेत.मात्र या ना त्या कारणाने पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते.खालील पुरस्कार प्राप्त तालुका पत्रकार ंसंघाच्या पदाधिकर्‍यांना सूचित करण्यात येते की,25 जून 2017 रोजी नागपूर येथे पुरस्कार वितरण होणार आहे.या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.रेशीमबागेत दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम होत आहे.संबंधित पुरस्कार प्राप्त संघांनी याची नोंद घ्यावी आणि कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती .–
पुणे विभाग ः हवेली तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा पुणे )
 
नाशिक विभाग ः दिंंडोरी तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा नाशिक )
 
अमरावाती विभाग ः आकोट तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा अकोला )
 
औरंगाबाद विभाग ः जिंतुर तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा परभणी)
 
कोल्हापूर विभाग ः तासगाव तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा सांगली )
 
कोकण विभाग ः दापोली तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा रत्नागिरी )
 
नागपूर विभाग ः रामटेक तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा नागपूर )
 
लातूर विभाग ः कळंब तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा उस्मानाबाद )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here