दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे संबंध महाराष्ट्राला माहिती आहेत.. मात्र इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक़मास दोघेही दरवर्षी एकत्र असतात.. गेली तीन वर्षे मी देखील या कार्यक्रमास उपस्थित असतो.. आज मी पत्रकारांचे प्रश्न भाषणात तर जोरदारपणे मांडलेच त्याच बरोबर दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा ही केली.. पत्रकार संरक्षण कायदा होण्यापूर्वी कायद्याला सर्वपक्षीय विरोध होता.. मात्र स्व. आर. आर.पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी मात्र कायम पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे अशी भूमिका घेतली होती.. त्याची आठवण आज मी भाषणात करून दिली.. दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोघांनीही पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले..

इंदापूर तालुका पत्रकार संघ हा क्रियाशील पत्रकार संघ आहे.. विविध उपक्रम संघाच्या माध्यमातून घेतले जातात.. कार्यक़माचे नियोजन देखील आखीव रेखीव असते.. राजकुमार थोरात आणि सांगळे तसेच त्यांच्या सर्व सहकार्‍यांना धन्यवाद.. माझ्या सोबत मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेचे राज्य प़मुख बापुसाहेब गोरे, पुणे जिल्हा प़मुख जनार्दन दांडगे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा संघाचे समन्वयक सुनील जगताप आदि होते.. कार्यक्रम छानच झाला.. कोरोना काळात उत्तम काम करणारया पत्रकारांचा आणि अन्य मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here