पत्रकार बेपत्ता

0
719

मुंबई : कल्याण येथील हाजी मलंग येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेला २१ वर्षीय पत्रकार गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सन्निध पुजारी असे पत्रकाराचे नाव असून, तो इंग्रजी वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करत आहे. या प्रकरणी मंगळवारी मुलुंड पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली. मुलुंड पश्‍चिमेकडील अमरनगर परिसरात पुजारी ५८ वर्षीय आईसोबत राहतो. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या नवी मुंबई कार्यालयात तो पत्रकार म्हणून कार्यरत आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी मित्रांसोबत कल्याण येथील हाजी मलंग येथे जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. त्यानंतर आईने त्याला फोन केला असता, मोबाइल बंद लागला. एकीकडे मोबाइल बंद लागत असताना, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतला नाही. सुरुवातीला कामासाठी बाहेर गेला असल्याच्या विचाराने त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, दुसर्‍या दिवशीही फोन बंद लागत असल्याने आईने मित्र, सहकार्‍यांकडे विचारपूस केली. मित्रांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. अखेर मंगळवारी पुजारी यांच्या आईने मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here