आम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल 

0
14509

त्यांची मतं लोकांना पटोत किंवा न पटोत,त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडो अथवा न आवडो त्यांनी ती नेहमीच रोखठोक,सडेतोडपणे मांडली.ताकाला जाऊन भांडं लपविण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही.त्यामुळं एकाच वेळी ते टिकेचे धनी जसे ठरले तसेच लोकांनी त्यांना डोक्यावरही घेतलं.संपादक,अँकर,चळवळीतला कार्यकर्ता म्हणून ते अनेकदा वादग्रस्तही ठरले पण त्यांनी आपल्या भूमिकेशी कधी प्रतारणा केली नाही.त्यामुळंच त्यांचे कट्टर टिकाकार किंवा व्यक्तीगत पातळीवर त्यांचा व्देष करणारेही निखिल वागळेंचा शो कधी चुकवायचे नाहीत.आक्रमक,थोडे हटवादी,आपली मतं समोरच्यावर लादणारे वागले आजही  लोकांना हवेहवेसे वाटतात.त्यांच्यासमोर बसणं,त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरं देणं हे भल्या भल्यांच्या पोटात गोळा आणणारं असत.  त्यांच्या प्रश्‍नांच्या सरबत्तीपुढं अनेकांची भंबेरी उडताना आपण असंख्य वेळा टीव्हीवर पाहिलं आहे.महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पत्रकार म्हणून आजही त्यांच्याकडं पाहिलं जातं. अनेकांना निरूत्तर करणार्‍या निखिल वागळे यांचीच मुलाखत घ्यायचं ठरलं तर ते प्रश्‍नांना कशी उत्तर देतील ? असा प्रश्‍न अनेकांना पडतो.महाराष्ट्रातील पत्रकारांना निखिल वागळे यांची मुलाखत ऐकण्याची संधी मराठी पत्रकार परिषच्या शेगाव अधिवेशनात मिळणार आहे.निखिल वागळेंना प्रश्‍न विचारणार आहेत देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख राजेश राजोरे आणि मुक्त पत्रकार नरेंद्र लांजेवार.

ज्यांना आपण टीव्ही वर बघतो अशा निखिल वागळे यांना प्रत्यक्ष पाहण्याची त्यांची मतं ऐकण्याची संधी आपणास मिळणार आहे.20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 9.30 वाजता.

शिवाय समारोपाच्या कार्यक्रमातही निखिल वागळे देशातील मिडिया सध्या कोणत्या अवस्थेतून जात आहे यावर मुक्त चिंतन करतील..-

LEAVE A REPLY