आब्याचे उत्पादन यंदा वाढणार

0
154

अलिबागः पोषक वातावरण आणि कीड रोगांचा फारसा प्रादुर्भाव नसल्याने यंदा आंबा उत्पादनात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे.
आंब्याला ऑक्टोबरमध्ये पालवी फुटल्यानंतर जानेवारीत मोहर यायला सुरूवात झाली.आता या मोहराचे रूपांतर कैरयांमध्ये झाले आहे.रायगड जिल्हयात 42 हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली गेलेली आहे.त्यातील 14 हजार 500 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे.त्यापैकी 80 त85 टक्के क्षेत्रावर मोहर व कैर्‍या लागलेल्या असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.रायगड जिल्हयातील आंब्याचे वार्षिक सरासरी उत्पादन 21 हजार 424 मेट्रिक टन एवढे आहे यामध्ये यंदा वाढ अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY