पत्रकारांना संरक्षण मिळावेः श्रीपाल सबनीस 

पुणे ःमहाराष्ट्रातील काही राजकारण्यांनी पत्रकारांचे प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित करून त्यांच्या न्याय्य मागण्यां सोडविण्याची मागणी केलेली असतानाच आता साहित्यिकही पत्रकारांच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी स्पष्टपणे लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली आहे.राज्यातील पत्रकारांच्या मागणीस समजातील विविध घटकांचा मिळत असलेला पाठिंबा हे पत्रकारांच्या चळवळीचे यश आहे.

शासन प्रशासन आणि न्यायसंस्था हे लोकशाहीचे तीन स्तंभ सुखात आहेत.त्यामुळे ते भक्कम आहेत.पण चौथा स्तंभ मानल्या जाणार्‍या पत्रकारितेवर सातत्यानं अन्याय होत आहे.मग लोकशाही कशी समृध्द होईल त्यासाठी सरकारने पत्रकारांचे प्रश्‍न प्राधन्याने सोडवावेत.अशी मागणी संमेलनाध्यक्ष डॉ,श्रीपाल सबनीस यांनी केली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 76 व्या वर्धापन दिन समारंभात मराठी पत्रकारिता इतिहास वर्तमान आणि भवितव्य या विषयावर ते बोलत होते.
सबनीस म्हणाले,पत्रकारितेवरील हल्ले वाढत आहेत.हा चिंतेचा विषय आहे.त्यामुळे पत्रकारितेच्या सुरक्षिततेपासून महत्वाच्या सुविधांपर्यंत सरकारने लक्ष द्यायला हवे.मराठी भाषा.साहित्य समृध्द करण्याचे आणि समाजाला नवी दिशा देण्याचे काम पत्रकारितेने केले आहे.त्यामुळे या मागण्यांच्या संदर्भात मी पत्रकारांच्या सोबत असेल.रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या आंदोलनातही सहभागी होण्याची माझी तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here