आता मुळशीत पत्रकार भवन

0
773

मुळशी तालुका पत्रकार संघाची ही तीन मजली इमारत आहे.इथं बसून आता मुळशी परिसरातील पत्रकार आता आपल्या दैनिकासाठी बातम्या पाठवतील.तालुक्याच्या विकासाला हातभार लावतील.इथं एक सुसज्ज हॉल आहे,चहा,नास्त्याची व्यवस्था असेल,आणि बाहेरचे पत्रकार आले तर त्यांच्यासाठी एक सूट देखील असेल.सुसज्ज ग्रंथालय होत आहे,अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन्स आहेत.जागा एका दानशुर व्यक्तीनं दिली.निधी संकलन करून ही इमारत बांधली गेली.जिल्हा पत्रकार संघाच्या इमारती सर्वत्र आहेत.तालुका पत्रकार संघाची एवढी देखणी वास्तू आणि सुसज्ज यंत्रणा मी राज्यात कुठं पाहिली नाही.राज्यातली ही सुसज्ज अशी पहिलीच इमारत आहे हे नक्की.

एक ते सव्वा वर्षात इमारतीचं बांधकाम झालं.आता 25 मे रोजी उदघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि खा.सुप्रिया पवार यांच्या उपस्थितीत होतंय.तत्पुर्वी आम्हाला इमारत पाहण्यासाठी बोलावण्यात आलं होतं.मी,सुभाष भारव्दाज,शरद पाबळे,सुनील वाळुंज,राजेंद्र कापसे गेलो होतो.सारी व्यवस्था पाहून आम्ही खूष झालो.इमारत पूर्ण कऱण्यासाठी सर्वच पत्रकारांचा हातभार लागला असला तरी त्यातही अध्यक्ष राजेंद्र मारणे आणि दत्तात्रय सुर्वे यांना विशेष धन्यवाद द्यावे लागतील.त्यांनी घरचं काम समजून या कामाकडं पाहिलं.दोघाचंही अभिनंदन.पत्रकारांमध्ये एकी तर हवीच पण कोणी तरी झोकून देऊन कामाला लागलं पाहिजे.ती भूमिका राजेंद्र मारणे यांंंंनी पार पाडली.आनंद वाटला.राज्यातील सर्वच तालुका पत्रकार संघांनी आदर्श घ्यावा असं हे काम झालंय.उद्‌ घाटन समारंभास किमान पुणे जिल्हयातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपल्या मित्रांच्या कार्याचं कौतूक करावं.विनंती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here