पत्रकार संरक्षण कायद्यासाठी आता
प्रेस कौन्सिल देखील आग्रही

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा करावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने जेव्हा 2005 मध्ये सर्वप्रथम स्व.आर.आर.पाटील यांच्याकडे केली तेव्हा अनेकांनी ही मागणी अप्रस्तुत तर आहेच पण ही मागणी कधीच पूर्ण होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.मात्र अगोदर मराठी पत्रकार परिषदेचा पाठपुरावा आणि नंतर राज्यातील 12 पत्रकार संघटनांनी एकत्र येत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन करून त्यामार्फत दिलेला लढा यातून महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा झाला.त्यानंतर आता अन्य राज्यातही असा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत.गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी तर जूनच्या अधिवेशनात या कायद्याचे विधेयक आणण्याचे आश्‍वासन एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांना भेटलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळास दिले आहे.आता तर थेट प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं केंद्र सरकारकडेच शिफारस करीत पत्रकार सुरक्षा कायदा करण्याची मागणी केली आहे.प्रयागराज येथे पत्रकारांशी बोलताना प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे चअरमन न्या.चंद्रमौली कुमार प्रसाद यांनीच ही माहिती दिली.प्रेस कौन्सिलची ही मागणी केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेतली तर येत्या काही दिवसात सर्वच राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू होऊ शकतो त्यासाठी मराठी पत्रकार परिषद देखील प्रयत्न करणार असून शेजारच्या राज्यात त्यासाठी परिषदेचे पदाधिकारी दौरे देखील करणार आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here