आणखी एका पत्रकाराला 1लाख 65 हजारांची मदत

0
749

परभणीचा देशोन्नतीचा पत्रकार शिवाजी क्षीरसागरवर मुंबईत टाटामध्ये उपचार सुरू आहेत.मुंबईची ओळख नाही,राहायला ठिकाणा नाही,खिश्यात दमडी नाही अशा अवस्थेत आई,वडिल आणि मेव्हण्याला घेऊन मुंबईत दाखल झालेला शिवाजी पहिले चार -पाच दिवस टाटासमोर फुटपाथवरच राहिला.याची माहिती जेव्हा आम्हाला मिळाली तेव्हा मी आणि किरण नाईकनं त्याची टाटामध्ये जाऊन भेट घेतली.त्यानंतर त्याची राहण्याची व्यवस्था केली.त्यासाठी मृणीलिनी नानिवडेकर तसेच केशव उपाध्ये यांची मोलाची मदत झाली.राहायचा प्रश्‍न सुटला असला तरी आर्थिक मदतीची त्याला गरज होती.हा विषय मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार आरोग्या सेवा कक्षाच्या टिमनं हाती घेतला.किरण नाईक,मंगशे चिवटे.विनोद जगदाळे,मिलिंद अष्टीवकर यांनी मुख्यमंत्री आरोग्य कक्षाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.आरोग्य कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे तसेच नितीन जाधव यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून शिवाजी क्षीरसागरला ला मदत मिळवून देली आहे. शिवाजीच्या उपचारासाठी आज 1 लाख 65 हजारांची रक्कम टाटा हॉस्पिटलच्या खात्यावर जमा झाली आहे.थोड्यावेळा पुर्वाच शिवाजीचा फोन आला होता.गहिवरून तो बोलत होता.मुंबईत कोणी ओळखत नसताना आपण देवासारखे पाठिशी उभे राहिलात अशा भावना तो व्यक्त करीत होता.एक चांगलं काम आपल्या हातून घडल्याचं समाधान नक्कीच आहे.शिवाजी क्षीरसागरला मदत मिळवून देण्यासाठी ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले अशा सर्वांचे आम्ही मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आभार व्यक्त करतो.परिषदेची पत्रकार आरोग्य सेवा कक्षा आणखी दोन पत्रकारांना मदत मिळवी यासाठी प्रयत्न करीत आहे.त्यातील एक पत्रकार कोल्हापूरचे तर दुसरे नंदुरबारचे आहेत.ज्या पत्रकारांना आरोग्यविषयक मदत हवी असेल तयांनी परिषदेच्या आरोग्य सेवा कक्षाशी संपर्क साधावा( एस.एम.) –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here