आकर्षक शिर्षक आणि उत्कृष्ट मांडणीनं सजले अंक

0
764


मुंबईः भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ला करून अतिरेक्यांचा अड्डा उध्दवस्त केल्याची बातमी देशातील सर्वच वृत्तपत्रांनी स्वाभाविकपणे विस्तारानं दिलेली आहे.या बातमीचे विविध पैलू उलगडून दाखविताना वृत्तपत्रांची पानंच्या पानं भरली आहेत.अशी एखादी मोठी बातमी असते तेव्हा वृत्तपत्राचं पहिलं पान कसं सजवायचं,समर्पक शिर्षक कोणतं द्यायचं याबाबत वृत्तसंपादक आणि रात्र पाळीच्या मुख्य उपसंपादकांचा कस लागत असतो.थोडक्यात सारा आशय समजेल असं हेडिंग असलं पाहिजे याकडं सर्वच संपादकांचा कल असतो.त्यादृष्टीनं आजचे अंक नक्कीच पाहण्यासारखे आणि वाचण्यासारखे झाले आहेत.महाराष्ट्र टाइम्सनं बदला एवढंच समर्पक शिर्षक देत पोटमथळे देऊन अंक सजविला आहे.हल्ल्याची अनेक छायाचित्र मटानं पाहिल्या पानावर दिली आहेत.पुढारीनं पुलवामाचा बदला असं मुख्य शिर्षक देत आठ कॉलमचे अन्य दोन मथळे देऊन मिराजचे मोठे छायाचित्र सोबत दिले आहे.लोकमतनंही अद्ल असं शिर्षक देऊन पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचा खातमा असा आठ कॉलमचा दुसरा मथळा दिला आहे.सकाळनं छान जॅकेट केलं आहे..घुसून मारले हे त्याचं शिर्षक असून बातमीशी निगडीत अनेक घटना ठळक स्वरूपात मांडल्या आहेत.दिव्य मराठीनं पाकमध्ये घुसून दहशतवादी अड्डयांचा खात्मा असं आठ कॉलमी शिर्षक देऊन बातमीची मांडणी केली आहे.लोकसत्तानं पाकिस्तानवर हवाई हल्ले असं शिर्षक देत अंक सजविला आहे.सामनाचं शिर्षक आणि मांडणी देखील आकर्षक आहे.इंग्रजी वर्तमानपत्रांची शिर्षक आणि मांडणी देखील आकर्षक आहेत.सर्वच वर्तमानपत्रांनी आज अग्रलेख लिहून भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केले असून या हल्लयाचं स्वागतही केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here