सर्व तालुका आणि जिल्हा संघ तसेच विविध पत्रकार संघटनाच्या पदाधिकार्‍यांसाठी  महत्वाचे निवेदन*
—————————————-
मित्रहो,
“राज्यातील सर्व वयोगटातील पत्रकारांना कोरोना लस द्यावी आणि जे 78 पत्रकार कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत अशा पत्रकारांच्या नातेवाईकांना किमान पाच लाख रूपयांची मदत द्यावी’ या मागणीसाठी आपण उद्या इ-मेल पाठवा आंदोलन राज्यभर करीत आहोत.त्यासाठी जे निवेदन आपणास पाठवायचे आहे त्याचा मसुदा खाली दिलेला आहे.या निवेदनाखाली परिषदेच्या पदाधिकार्‍यांची नावे असली तरी आपण निवेदन पाठवत असताना आप-आपल्या जिल्हयातील किंवा तालुक्यातील पदाधिकार्‍यांची नावं या निवेदनाखाली टाकून त्यावर स्वाक्षर्‍या करून हे निवेदन मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री,आरोग्य मंत्री,माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री ,माहिती व जनसंपर्क महासंचालक, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम..देशमुख तसेच आपल्या जिल्हयाचे पालकमंत्री आणि तालुका संघांनी आपल्या तालुक्यातील आमदारांना या निवदेनाच्या प्रती मेल करायच्या आहेत.ज्यांना शक्य आहे त्यांनी पुरेशी काळजी घेत ही निवेदनं तहसिलदारांना किंवा जिल्हाधिकारी यांना द्यायला हरकत नाही.मात्र योग्य ती खबरदारी घेऊनच..अर्थात तहसिलदाारांना निवेदनं दिली तरी खाली दिलेल्या इ-मेल अ‍ॅड्रेसवर हे मेल गेलेच पाहिजेत याची काळजी सर्वांनी घ्यावी ही विनंती.
आपल्या मागण्या न्याय्य आहेत आणि आपली भक्कम एकजूट दाखविण्याची ही वेळ आहे.तेव्हा जास्तीत जास्त मेल मान्यवरांना पाठवावेत..तसेच ट्विटर ,इन्स्ट्राग्राम वरून मान्यवराना  देखील ही निवेदनं पाठवावीत अशी विनंती आहे.किमान 500 मेल गेले पाहिेजेत असा आपला प्रयत्न असून ते आपल्या सहकार्यावरच अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here