– अल्पसंख्याकांचे प्रश्न तांतडीने सोडविण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात असून रायगड जिल्हयातील अल्पसंख्याकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा सुरु आहे अशी माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री.मुनाफ हकीम यांनी दिली.
रायगड जिल्हयातील कर्जत येथे श्री मुनाफ हकीम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिका-यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कर्जत तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, रोजगार या समस्यांचा आढावा यावेळी घेण्यात आला.अल्पसंख्याक समाज केवळ मुस्लीम नसून त्यात अन्य धर्मीय यांचाही समावेश आहे. तत्पूर्वी श्री हकीम यांनी कर्जत, खालापूर, सुधागड या तालुक्यातील अल्पसंख्याकांच्या प्रश्नाबदद्ल माहिती जाणून घेतली. दफनविधी,रस्ते, शैक्षणिक सुविधा याबद्दलची माहिती जाणून घेतली. शासनाच्या विविध योजानांच्या माध्यमातून या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.