आज दुपारी दोन वाजता समुद्रास येणारी भरती या महिन्यातील सर्वात मोठी भरती असेल.दुपारी 4.85 मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकतील अशी शक्यता असल्याने समुद्राकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.रायगड जिल्हयात समुद्राच्या किनाऱ्यावर 53 गावं असून खाडीच्या काठावर 72 गावं आहेत.ही सारी गावं धोका रेषेत येतात.या गावांनाही सावध राहण्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान काल रात्री अलिबाग आणि परिसरात दोन तास जोराचा पाऊस झाला.आज सकाळपासून अलिबाग,मुरूड,पेण आदि ठिकाणी पाऊस कोसळत आहे.या पहिल्याच पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी आणि समुद्रात उठणाऱ्या महाकाय लाटांचा आनंद लुटण्यासाठी अलिबागच्या समुद्रावर पर्यटक आणि स्थानिकांनी गर्दी केली आहे.