अबू आझमीही बरळले

    0
    872

    समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांनी `लडकों से गलती हो जाती हैं, तो इसका मतलब ये तो नहीं की उन्हे फांसी दे दी जाऐं` असं संतापजनक वक्तव्य केलं होतं. बलात्कार करणाऱ्यांची पाठराखण करण्याचा आणि सत्तेत आलो तर कायद्यात बदल करण्याची भाषाही त्यांनी यावेळी केली होती.

    यावर, बोलताना पक्षाचे महाराष्ट्राचे नेते अबू आझमी यांनी मुलायमसिंग यांच्यापुढे एक पाऊल टाकलंय. बलात्कार प्रकरणांतील पीडितेलाही शिक्षा व्हायला हवी, असं धक्कादायक वक्तव्य करत अबू आझमींना आपल्या अकलेचे तारे तोडलेत. `बलात्कार प्रकरणांत फाशीची शिक्षा व्हायला हवी, असं इस्लाममध्ये सांगितलं गेलंय. पण, इथे मात्र पुरुषांनाच शिक्षा होते… स्त्रिया मात्र यातून अलगद सुटून जातात… स्त्रियाही तितक्याच दोषी आहेत ना` असं अबू आझमी यांनी म्हटलंय. `भारतात, तुमच्या इच्छेनुसार शरीर संबंधांना परवानगी दिली गेलीय. पण, याची तक्रार केली गेली तर मात्र हा गुन्हा ठरतो. आत्ता आपण अनेक केसेस पाहतो. कुणी हात लावला तर मुली तक्रार करतात आणि हात लावला नाही तरीही करतात. तेव्हा ही एक समस्या होते. जर बलात्कार तुमच्या संमतीनं किंवा संमतीशिवाय होत असतील तर इस्लाममध्ये त्याला शिक्षा सांगण्यात आलीय`

    `एखादी स्त्री विवाहीत किंवा अविवाहीत एखाद्या परपुरुषासोबत तिच्या संमतीनं किंवा संमतीशिवाय जात असेल तर तिलाही फासावर चढवलं जायला हवं… दोघांनाही फाशी व्हायला हवी`, असं आझमी यांनी म्हटलंय. `स्त्री-पुरुष संबंधांमध्ये सहमती असो अथवा नसो त्या महिलेला फाशी देण्यात यावी… ज्या महिलांवर बलात्कार झालाय त्यांनाही शिक्षा व्हायला हवी` अशी बेताल बडबड आझमींनी केलीय. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बेताल बडबड केलीय.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here