अलिबागःरायगड लोकसभा मतदार संघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार अनंत गंगाराम गीते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला.यावेळी त्यांच्या समवेत आदित्य ठाकरे,सुभाष देसाई,रामदास कदम तसेच भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.शिवसेनेच्यावतीने यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.गीते यांच्याप्रमाणेच आज श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती या अपक्ष उमेदवारानेही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.रायगड लोकसभा मतदार संघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे.4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.5 एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार आहे.

LEAVE A REPLY