परिषदेचे शेगाव अधिवेशन अविस्मरणीय ठरणार,
चचासत्र,परिसंवाद,मलाखतींचे भरगच्च कार्यक्रम

मुंबईः मराठी पत्रकार परिषदेच्या 19 आणि 20 ऑगस्ट रोजी शेगाव येथे होणार्‍या अधिवेशनाचे उद्दघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येत असून या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,पालकमंत्री पांडुरंग फुंडकर,अन्य मान्यवर तसेच ज्येष्ठ पत्रकारांना निमंत्रित करण्यात आलं आहे.परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख या 41 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष असतील.काल मुंबईत परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अधिवेशनाची रूपरेषा तयार करण्यात आली .
19 तारखेला सकाळी 10 वाजता उद्दघाटन संमारंभ सुरू होईल.तो साडेबारापर्यंत चालेल.साडेबारा ते दोन भोजन आणि विश्रांती असेल.त्यानंतर दुपारी 2 ते पाच यावेळेत दोन परिसंवाद होतील.त्यात मान्यवर पत्रकार आपली भूमिका मांडणार आहेत…सायंकाळी 6 वाजता पत्रकारांच्या कविता हा अनोखा कार्यक्रम होईल.रात्री 9 वाजता मनोरंजनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
20 तारखेला येणार्‍या पत्रकारांना सकाळी गजानन महाराजाचें दर्शन घेता यावे यासाठी सकाळचा कार्यक्रम 10 वाजता ठेवला जात आहे.पहिल्या सत्रात शेतकर्‍यांची दुःख आणि माध्यमांची भूमिका हा हा सध्याच्या ज्वलंत प्रश्‍नावरचा परिसंवाद आयोजित करण्यात येत असून त्यात तीन पत्रकार आणि तीन शेतकरी नेते आपली भूमिका मांडतील. दुपाऱच्या सत्रात एका लोकप्रिय संपादकाची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे..त्यानंतर परिषदेचे महत्वाचे खुले अधिवेशन होईल त्यात विविध ठराव संमत केले जातील.समारोप समारंभास मान्यवर पत्रकारांसह ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे..दोन दिवस पत्रकारांसाठी भरगच्च बौध्दिक मेजवाणी असेल.सुंदर आणि भव्य अशा हॉलमध्ये हा कार्यक्रम होत असून येणार्‍या पत्रकारांची राहण्याची,भोजणाची व्यवस्था चोख ठेवली जाणार आहे.देशभरातून अडीच हजार पत्रकार येतील असे गृहित धरून नियोजन आणि व्यवस्था केली जात आहे.
काल परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस विश्‍वस्त किरण नाईक,विभागीय सचिव तथा अधिवेशनाचे संयोजक राजेंद्र काळे,मराठवाडा विभागीय सचिव अनिल महाजन,पुणे विभागीय सचिव शरद पाबळे,अधिवेशनत संयोजन समितीचे सदस्य अरूण जैन,सोशल मिडिया सेलचे शरद काटकर,संतोष स्वामी,दीपक भागवत,सुनील वाळुंज आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY