अधिवेशन ऐतिहासिक करणार!

□ नांदेडच्या पत्रकारांचा निर्धार

□नांदेड येथे पूर्वतयारी बैठकीत पत्रकारांचा निर्धार
नांदेड/प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन नांदेड येथे होणार असून हे अधिवेशन ऐतिहासिक करणार आसा निर्धार नांदेडच्या पत्रकारांनी रविवारी संपन्न झालेल्या पूर्वतयारी बैठकीत केला आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन दि. १७ व १८ ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणार आहे या अधिवेशनाच्या पुर्व तयारीसाठी जिल्ह्य़ातील संपादक ज्येष्ठ पत्रकार,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ,महानगर,तालुका पदाधिकाऱ्यांची व्यापक स्वरूपाची बैठक रविवारी दि.३० रोजी सह्याद्री विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठय़ा उत्साहात संपन्न झाली.बैठकित अनेक विषयावर सविस्तर चर्चा करून अधिवेशन ऐतिहासिक करण्याचा निर्धार पत्रकारांनी केला आहे

यावेळी परिषदेचे माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी परिषद कार्यकारिणी सदस्य प्रकाश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी,जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे,परिषद प्रतिनिधी नरेश दंडवते,महानगर कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार, सरचिटणीस अभय कुळकजाईकर,आदींची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्ष व उपस्थितांनी तयारी बाबतीत माहिती दिली. अधिवेशनासाठी भव्य सुसज्ज असे भक्ती लाॅन्स सभागृह निश्चित करण्यात आले तर अधिवेशन काळातील येणार्‍या पत्रकारांची निवास व्यवस्था भोजन व्यवस्था, स्तळापर्यंत प्रवास व्यवस्था,स्वागत कक्ष,जबाबदारी निश्चित करणे यासह अधिवेशनाचे उद्घाटक,प्रमुख पाहुणे, स्वागताध्यक्ष,आदी निश्चित करणे मान्यवरांना निंमत्रण देने. व्यवस्था करणे यासह अधिवेशनाच्या सत्रातील परिसंवाद काय असावेत यावर चर्चा झाली अनेक विषय पुढे आले त्यात कांही विषय 1)ग्रामीण भागातील पत्रकारिता व बदलते तंत्रज्ञान 2)शासन भूमिका व पत्रकार3)कामगार शेतजूर,पर्यावरण,पाणी ,शिक्षण, बेटी बचाव असे कांही विषय चर्चिले गेले तर राष्ट्रीय किंवा पत्रकारितेवर व्यासंगी व्यक्तिमत्व असे पत्रकारांना मार्गदर्शनासाठी बोलावणे यासह पत्रकार व सर्व समाज घटकास प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची प्रकट मुलाखत असावी व कांही चांगल्या सुचना व विषय व्यक्तिगत कळविण्या बाबतीत सुचना करण्यात आल्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्षांनी चांगले विषय सुचविले व जबाबदारी पुर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याची हमी दिली जसे माहूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या पत्रकारांना पूर्ण सुविधा पुरविणे तर किनवटने आदिवासी ठेमसा स्वागत नृत्य टिम सहभागी करण्यासाठी पुढाकार घेतला.लोहा,हिमायतनगर,मुदखेड,भोकर,बिलोली, देगलूर, मुखेड,नायगाव,सर्व तालुक्याच्या वतीने जबाबदारी यशस्वी पुर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी जेष्ठ संपादक धोंडोपंत विष्णूपुरिकर काका, डाॅ. जुगलकिशोर धुत कोषाध्यक्ष राजेश शिंदे ,उज्वलाताई भवरे, लक्ष्मण भवरे, हरिहर धुतमल,नंदकुमार कांबळे,किरण कुलकर्णी, अनिल धमने, हरीश ठक्कर,दिपांकर बावस्कर, नरेश तुप्तेवार,शिवाजी फुलवळे,एल.ए.हिरे,हर्ष कुंडलवाडीकर,राजेन्द्र कांबळे, सुर्यकुमार यन्नावार,जि.पी. मिसाळे,बाळासाहेब पांडे,यासीन ईनामदार,चंदनकुमार मिश्रा,एस.एम.मुदखेडकर,दुर्गादास राठोड, ज्ञानेश्वर पंदलवाड, गौतम कांबळे, बालाजी हानमंते, किशन भोयर,प्रदीप वाकोडीकर, बी.आर.पांचाळ,गजानन चौधरी,शिवाजी कोनापुरे, इम्रानखान पठाण,सुरेश काशिदे, प्रकाश जैन,परमेश्वर गोपतवाड, सोपान बोंमपीलवार,अनिल मदसवार त्रिरत्नकुमार भवरे, गजानन कानडे,प्रशांत गवळे,संजय कोलते,बजरंग संगनवार, रूक्माजी शिंदे, बालाजी नागाठाणे, प्रवीण खंदारे,यासह सर्व तालुका व जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठक खेळीमेळीने उत्साहात संपन्न झाली शेवट उपस्थितांचे सुभाष लोणे यानी आभार व्यक्त करून आजची सभा समाप्त करण्यात आल्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY