अजित पवार-रामशेठ ठाकूर भेट

  0
  808

  राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पनवेल येथे कॉग्रेसचे नेते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी रायगड आणि मावळ मतदार संघांबाबत चर्चा केली.अजित पवार यांच्या समवेत मावळमधील राष्ट्रवादीचे उमेदवार राहूल नार्वेकरही होते.चर्चा अर्धातास झाली पण चर्चेचा तपशील लगेच समजू शकला नाही.

  पनवेल विधानसभा मतदार संघ सध्या कॉग्रेसकडे असून तेथे रामशेठ ठाकूर यांचे चिरजीव प्रशांत ठाकूर आमदार आहेत.तसेेच पनवेल नगरपालिकाही कॉग्रेसकडे असल्याने पवार-ठाकूर भेटीला विशेष महत्व आहे.रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांनी देखील काल रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना मदतीची विनंती केली.
  दरम्यान राहूल नार्वेकर यांच्या उमेदवारीबाबत रायगड जिल्हयातील राष्ट्रवादीमध्ये मोठी नाराजी आहे.शिवसेनेचे रायगड ंसंपर्क प्रमुख असताना नार्वेकरांनी राष्ट्रावादील मोठा त्रास दिल्याचा आरोप पक्षाचे कार्येकर्ते करीत आहेत.अजित पवार यांनी नाराज पक्ष कार्यकत्यार्ंंची देखील समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here